शासनाच्या विविध फी-सवलती व शिष्यवृत्त्या
शासनाच्या विविध फी-सवलती (Fee Concessions):
आर्थिकदृष्ट्या मागास पालकांच्या मुलांना फी सवलत (EBC)
प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मिळणारी फी सवलत (P.T.C)
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण (STW)
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना फी सवलत (Fee Concession to B.C. Students)
शासनामार्फत मिळणाऱ्या शिष्यवृत्ती (Scholarships):
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी भारत सरकारची शिष्यवृत्ती (BC Scholarship of Govt. of India)
राज्य सरकारची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती (State Govt. Merit Scholarship)
अपंगांसाठी शिष्यवृत्ती (Scholarship to physically Handicapped)
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारची गुणवत्ता शिष्यवृत्ती (State Govt. Merit Scholarship to Rural Students)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत मिळणाऱ्या शिष्यवृत्ती:-
क्रांतिज्योती सावित्रीमाता फुले अर्थसहाय्य योजना
आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजना
राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती
वरील फी-सवलती आणि शिष्यवृत्ती या संबंधीचे नियम, अटी इत्यादीची विस्तृत माहिती खालील तक्त्यात दिली आहे. ती वाचून संबंधितांनी दिलेल्या मुदतीत सर्व कागदपत्रे जोडून अर्ज करावेत. केवळ अर्ज केल्यावर शिष्यवृत्ती/सवलत मिळाली असे समजू नये. शासकीय छाननीत अर्ज नामंजूर झाल्यास सर्व फी भरावी लागेल.
फी सवलती किंवा शिष्यवृत्ती मंजूर झाल्यावर पुढे विद्यार्थ्याची अभ्यासातील प्रगती कमी झाल्यास, तो तासांना गैरहजर राहत असल्यास, गैरशिस्तीचे वर्तन दिसून आल्यास त्याला मंजूर झालेली फी - सवलत किंवा शिष्यवृत्ती रद्द करण्यात येईल. याबाबत प्राचार्यांचा निर्णय अंतिम राहील. वर उल्लेखिलेल्या शिष्यवृत्ती आणि फी सवलती व्यतिरिक्त अनेक जाती संस्था, संघटना, धर्मदाय संस्था, पालक जेथे सेवेत आहेत ती कार्यालये यांचे मार्फत फी सवलती, शिष्यवृत्त्या, अर्थसहाय्य व अन्य सहाय्य दिले जाते. शिक्षणक्रम पूर्ण करण्याकरिता काही अटींवर बँकाकडून कर्ज मिळू शकते. या सर्वांची निवेदने वृत्तपत्रात येतात. यासंबंधी जागरुकपणे विद्यार्थ्याने स्वत: प्रयत्न करणे इष्ट ठरते. या संदर्भात महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन व सहकार्य मिळेन. हे सर्व अर्ज महाविद्यालयामार्फत पाठवावे लागतात. अर्ज मागविणे, अर्ज भरणे, ऑफिसमधून त्यावर तपशील भरून घेणे, सही शिक्के घेऊन अर्ज पाठविणे इत्यादी कामे संबंधित विद्यार्थ्याने स्वत: करावीत.
सर्व विद्यार्थ्यांनी सूचना फलकावरील सूचना रोज पहाव्यात. सूचना न वाचल्यामुळे किंवा कागदपत्रांची वेळेत पूर्तता न केल्यामुळे सवलत/शिष्यवृत्ती न मिळाल्यास महाविदयालय त्यास जबाबदार राहणार नाही.
आता या सर्व शिष्यवृत्ती "राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती" या एकाच योजनेखाली MahaDBT पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून मिळविता येतील. सविस्तर माहिती या पेजवर दिलेली आहे.
राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती
SCHOLARSHIPS :
Our college Provides all the scholarship issued through Government. These scholarships are given to the students from various caste and Regulations. BC cell is active in our college for scholarship related work issue. On behalf of BC cell, students are Provided more information abut scholarship and scholarship ,as well as document completion for related scheme is also guided and the scholarship are issued.
The following scholarships are issued by our college:-
Government of India scholarship for SC, ST,NT,OBC,SBC,PTC
Rajashi Chhatrapati Shahu scholarship
X-.Serviceman scholarship
Sanstha Employee’s Scholarship
Minority Scholarship
State Government open merit scholarship / Sanskrit Scholarship
Rajashi Chhatrapati Shahu Open merit ( Junior College )
Economically backward national Scholarship
To know more about scholarship given by government log on to ‘MAHADBT’ website
मा. शिक्षण सहसंचालक यांचे कडून मंजूर होणाऱ्या शिष्यवृत्ती :
त्यांच्या वेबसाईट वरील पेज साठी येथे क्लिक करा राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना
गणित / भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
शासकीय विदयनिकेतन शिष्यवृत्ती
राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना
एकलव्य शिष्यवृत्ती योजना
हिंदी शिष्यवृत्ती
केंद्र शासनाची अल्पसंख्याक पोस्ट मेट्रिक शिष्यवृत्ती योजना
राज्य शासनाची अल्पसंख्याक पोस्ट मेट्रिक शिष्यवृत्ती योजना
(ई.बी.सी.) ज्यांचे किंवा ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.1,00,000 पेक्षा अधिक नाही अशा विद्यार्थ्यांना सवलती
माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती
स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती
आर्वषनग्रस्त खेड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी परिपूर्ती करणे