Students' Safety Insuranceविद्यार्थी सुरक्षा विमा योजना

विद्यार्थी सुरक्षा विमा योजना: (Students Safety Insurance Scheme)

आपल्या महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यास दुर्दैवाने आग, बुडून, रस्ता/रेल्वे अपघात, सर्पदंश, विजेचा झटका, हिंस्त्र श्वापदांचा हल्ला, पूर, वादळ, भूकंप इ. दृष्य कारणामुळे होणारा मृत्यू/अपंगत्व यापासून संरक्षण मिळविण्यासाठी ही विमा योजना आहे. ही योजना प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यास लागू करण्यात आली आहे. दुर्दैवाने अशा प्रकारची घटना घडल्यास विद्यार्थी/पालकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह त्वरीत महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. नुकसान भरपाई मिळवून देण्यास महाविद्यालय सर्वतोपरी सहकार्य करेल. पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालयामार्फत १९९२-९३ सालापासून ही योजना सुरु केली असून त्यासाठी महाविद्यालयातर्फे प्रत्येक विद्यार्थ्याकडून रु. १० इतकी रक्कम अपघात विमा वार्षिक-शुल्क म्हणून घेऊन इन्शुरन्स कंपनीकडे जमा करण्यात येते.

एखादा विद्यार्थी दुर्दैवाने अपघातात सापडून मृत्यू पावल्यास किंवा अपंग झाल्यास किंवा हात-पाय, बोटे, कान इत्यादी अवयव गेल्यास त्याला/पालकांना नुकसान भरपाई आणि दवाखान्याच्या आणि औषधोपचाराचा खर्च विमा कंपनीकडून मिळतो. संबंधित पालकांनी/विद्यार्थिनीने अशा घटनेनंतर लवकरात लवकर संपर्क साधून नुकसान भरपाईचा दावा महाविद्यालयाचे कार्यालयातून आवश्यक त्या कागदपत्रांसह विमा कंपनीकडे सादर करावा.

सुरक्षा विमा संबंधी माहिती थोड्या फार फरकाने दरवर्षी तीच असते. लेटेस्ट माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर www.unipune.ac.in –Students Welfare – Circulars येथे पहावे.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता योजना व माहिती : येथे क्लिक करून पहा

तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी विकास अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.

विद्यार्थी सुरक्षा विमा योजनेसंबंधी माहिती

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी कल्याण मंडळ कार्यालयामार्फत विद्यार्थी सुरक्षा विमा योजना सन १९९२-९३ पासून सुरु करण्यात आली आहे. यासाठी ज्या विद्यार्थांनी महाविद्यालयात /मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतला आहे अशा सर्व विद्यार्थांकडून रू.१०/- विमा निधी म्हणून घेण्यात येतो.

शैक्षणिक २०१६-१७ साठी दि ओरिएन्टल इंश्योरेंस कंपनी लि. ठाणे डिव्हिजनल ऑफिस, नवीन जिल्हा परिषद कार्यालयाजवळ ,ठाणे (प) -४००६०१ यांच्याबरोबर विद्यार्थांच्या विमा संरक्षणासंबंधी करार करण्यात आला आहे. दि ओरिएन्टल इंश्योरेंस कंपनी लि. ठाणे डिव्हिजनल ऑफिस, नवीन जिल्हा परिषद कार्यालयाजवळ ,ठाणे (प) -४००६०१ या संस्थेचा पत्ता व दूरध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे आहेत. सदर विमा योजने अंतर्गत दावा दाखल करण्यासाठी पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये व मान्यताप्राप्त संस्थानी पुढील क्रमांकावर अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.

कार्यालयाचा पत्ता आणि फोन नं.

दि ओरिएन्टल इंश्योरेंस कंपनी लि.,

ठाणे डिव्हिजनल ऑफिस,

सरस्वती मंदीर, तिसरा मजला, मराठी ग्रंथ संग्रहालायाच्यावर,

सुभाष रोड, नवीन जिल्हा परिषद कार्यालयाजवळ , ठाणे (प.) – ४००६०१

फोन नं. : (०२२) २५४०२७२१ /२२ / २५४०११७२

फॅक्स : (०२२) २५३७८६१८

  • vaishali.gaikwad@orientalinsurance.co.in

  • rr.mundargi@orientalinsurance.co.in

  • smita.shenoy@orientalinsuranse.co.in

  • श्री. रोहन आर. घोडगेकर : ९८२०९३४७०१ / ९७५७२८२९१३ Mail ID : rghogekar04@gmail.com

  • विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई दावा दाखल करण्यासाठी विमा कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर त्या पत्राची एक प्रत मा. संचालक ,विद्यार्थी कल्याण मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे – ४११ ००७ यांना पाठवावी.

  • नुकसान भरपाई दावा दाखल करण्यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

सोबत : १. नुकसान भरपाई दावा अर्ज . २ . विमा कंपनीस सादर करावयाच्या कागदपत्रांची सूची - संचालक, विद्यार्थी कल्याण मंडळ

(टिप : नुकसान भरपाई दावा दाखल करण्याचे अर्ज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर www.unipune.ac.in –Students Welfare – Circulars –Updated Circulars –Students Insurance Letter 2016-17 मध्ये उपलब्ध आहेत.)


List of Documents for Claim : Death Case

1} Insurance Policy Copy, Students List.

2} Claim Form Dully Filled.

3} College I/D Card.

4} Admission Form.

5} Fee Receipt.

6} Mark Sheets.

7} Original Bonafide Certificate.

8} Student's Aadhar Card, Pan Card, Ration Card.

9} Police Papers - A.D.R. Report, Spot Panchnama, Witness Statement, Inquest Panchnama, Provisional Cause of Death Certificate.

10} Hospital Papers ( if any ).

11} Post Mortem Report.

12} Original Death Certificate.

13} Nominee's Aadhar Card, Pan Card, Written Statement, Bank Pass Book / Canceled Cheque.

14} College Pan Card, Light Bill, Canceled Cheque.


List of Documents for Claim : Injury Case

Required documents for injury claim :

1} Insurance Policy Copy, Student List.

2} Claim Form Dully Filled.

3} College I/D Card.

4} Original Bonafide Certificate.

5} Admission Form.

6} Fee Receipt.

7} Mark Sheet.

8} Student's Aadhar Card, Pan Card, Ration Card.

9} Police Papers - F.I.R. / A.D.R. Report, Spot Panchnama, Crime Details Form, Statement.

10} Hospital Papers - Discharge Card, Indoor Papers, Lab Reports, X-Ray Reports, Hospital Bill, Medical Bills, Lab Bills.

11} Disability Certificate ( if any ).

12} Fitness Certificate.

13} Driving License Copy ( In case driven the vehicle ).

14} Bank Pass Book / Canceled Cheque.

15} College Pan Card, Light Bill, Canceled Cheque.

All documents should be attested.