गुरुवर्य राजाराम परशुराम सबनीस
5-2-1894 to 25-9-1960
Born on 5th February, 1894 at Uran, in Satara District.
Completed primary education at Hubli in Karnataka.
Claimed 9th place in the merit list in the matriculation examination in 1909.
Topped the merit list with 2nd position in the examination of B.A. (Bachelor of Arts) from the University of Mumbai in 1913.
Went to England in 1914 for I.C.S. examination on the fellowship received from Wilson College, Mumbai.
Determined not to appear for I.C.S. examination under the powerful influence of Lokmanya Bal Gangadhar Tilak. Resolved to dedicate his life to service of the nation through education and dissemination of values.
Renounced all luxuries of life, pledged to observe lifelong celibacy and work for the betterment & up-gradation of the people in the rural area through education.
Received M.A. (Master of Arts) in Economics from Cambridge University in 1916.
Became a Superintendent of Nutan Marathi School in Pune & the life member of Shikshan Prasarak Mandal, Pune.
Wrote excellent & stylistic books on ‘Marathi Hitopdesh’, ‘Jagache Wangmaya’, and ‘Vaibhavshali Maharashtra’.
Worked as a Principal of Sir Parshurambhau College, Pune for three years.
Went to Junnar in 1935 after retirement and founded a new school for the education of the rural students.
The new school in Junnar was inaugurated by Hon’ble Balasaheb Kher, (Chief Minister of Mumbai State) on 2nd September 1939.
Conducted & flourished the school at Junnar from 1935 to 1944.
Came to Narayangaon (a village place about 50 Kms. away from Pune) in 1944 & founded a new school which is today known as Guruvarya R. P. Sabnis High School.
Blended education & agriculture knowledge by opening agriculture school & experimented successfully for multi-purpose use of education.
A deep & widely read person, Guruvarya Sabnis loved the best literature from Sanskrit, English & Marathi languages. Deeply influenced by the life & mission of the Marathi saints St. Dnyaneshwar, St. Tukaram & St. Ramdas, translated the Sanskrit Love-lyric ‘Meghdoot’ of Kalidasa in Marathi.
Passed away on 25th September 1960.
Saints are embodiments of holy action and noble words.
Great figures are like big towers that show the height that mankind strives to reach.
Success is the outcome of involvement in the work undertaken.
True education inculcates culturedness, tolerance and disposition for good deed.
Self-realization is the ultimate end of education.
A nation’s future depends on chaste, competent and industrious youth.
Belief in one’s endeavour and strength is as important as faith in God.
India has set democracy, universal peace and redemption of all as its goals. The present education system should work to create efficient and chaste citizen to achieve these goals.
What should be the nature of this education? It should be the development of body, mind and spirit.
It is difficult to describe the achievements of our past Marathi poets. St. Dnyaneshwara lived for a short period of nineteen years but his influence on the Marathi minds has not waned even after five hundred years. St. Tukaram’s Abhangs had reached to every corner of Maharashtra (in a period where printing presses were yet to come up). These great poets have enriched Marathi language.
He wore a glance as sharp as that of Great Chhatrapati Shivaji Maharaj, used sweet words in his mesmerizing speech, wore a smile on his radiant face and that would change foes into friends and their relations thereafter would last lifelong.
Glorious past is a preface to glorious future. It we do not attempt to keep our nation ahead of the world by working hard and improving our abilities, knowledge, courage and affluence, we will be discarded as incapable successors of eminent predecessors. Guruvarya Nanasaheb’s address to students during the inauguration function of the school: “Your place was enlightened by Shivaji Maharaj three hundred years ago. But in the succeeding times, there has been nothing else but utter darkness. There were no attempts here to fight for independence, to build beautiful temples, to compose inspiring literature, to create flourished forms of art. You should now stop this train of negation. You have to become nation-builders in future. So build a mini-nation here. Keep your place clean. If you change this wasteland into paradise, during next five years, you will be capable of changing your state and nation into paradise”.
English medium schools alone are irrelevant. Institutes that can bring about all-round development of villages are relevant and required. These institutes should build durable and economically reasonable houses, schools, auditoriums, run hospitals, small-scale courts, and workshops. They should consist of experts in agriculture. The retired persons from different fields can willingly offer their voluntary services to these institutes.
गुरुवर्य नानासाहेबांचे विचारधन
संत म्हणजे अत्यंत उदात्त उपदेश व अत्यंत पवित्र आचरण यांची सांगड होय.
थोर व्यक्ती म्हणजे देवपदाकडे मनुष्यजात ज्या भराऱ्या मारीत असते त्यांची उंची दर्शविणारे मनोरे होत.
हाती घेतलेल्या कार्यात एकाग्रता असली म्हणजे यश हमखास मिळते.
सुसंस्कृतपणा, सत्कृत्य आणि सहिष्णुता माणसाच्या अंगी बाणवते तेच खरे शिक्षण होय.
आत्म्याची उन्नती हेच शिक्षणाचे परोमच्च ध्येय आहे.
खेड्यांचा सर्वांगीण उत्कर्ष करणाऱ्या शिक्षणाची आज गरज आहे.
शीलवान, कर्तृत्वशाली, उद्योगी अशा तरुणांवर राष्ट्राची भावी उन्नती अवलंबून असते.
ईश्वरावर श्रद्धा असली तरी मानवी प्रयत्न आणि सामर्थ्याविषयी आत्मविश्वास महत्वाचा आहे.
भारताने लोकशाही, सर्वोदय व विश्वशांति असे आपले त्रिविध ध्येय ठरविले आहे. हे ध्येय साध्य करतील असे कार्यक्षम व चारित्र्यवान नागरिक तयार करणे हे आजच्या भारतीय शिक्षणपद्धतीचे काम आहे.
हे नवीन शिक्षण कसे असावे?मनुष्याला शरीर, बुद्धी किंवा मन आणि आत्मा असल्याने शिक्षणाला या तिन्ही अंगांचा मेळ बसवून त्यांचा विकास साधावयाचा असतो.
एकाग्रता यशोबीजम : एकाग्रता हीच यशाची गुरुकिल्ली.
मुलांचे शीलसंवर्धन होण्यास मदत होईल, वाड्मय वाचून वीरवृत्ती वाढेल, महत्वाकांक्षा प्रज्वलित होईल, ते समाजासाठी अगणित श्रम करण्यास कंबर बांधतील, थोर पुरुषांच्या मोठया पराक्रमाचे नाही तरी साध्या प्रसंगीच्या त्यांच्या वर्तनांचे अनुकरण करण्यास प्रवृत्त व्हावे. – प्रस्तावना
महाराष्ट्रातील भूतपूर्व कवींच्या सामर्थ्यांचे वर्णन काय करावे? केवळ एकोणीस वर्षात ज्यांची जीवितयात्रा आटोपली त्या ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीने लोकांच्या मनाला मारलेली मिठी पाच शतके लोटली तरी सैल होत नाही, एकही छापखाना नसताना तुकाराम महाराजांचे अभंग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरले.काळाच्या अंतापर्यंत दासबोधाची योग्यता कायम राहील. या थोर पुरुषांच्या वाड्मयसेवेने मराठी भाषेला वैभव प्राप्त झाले. थोर व्यक्ती म्हणजे देवपदाकडे मनुष्यजात ज्या भराऱ्या मारीत असते त्यांची उंची दर्शविणारे मनोरे होत.
शिवाजी महाराजांसंदर्भात – शिवाजी महाराजांच्या भेदक दृष्टीचा , एक कटाक्ष, त्यांच्या मोहक वाणीचा एक शब्द, त्यांच्या सतेज मुद्रेला भूषविणारे एक हास्य यांनी शत्रूंचे मित्र होऊन जात व तो स्नेहसबंध आमरणान्त तुटत नसे.
रामशास्त्री अहिल्याबाई संदर्भात – त्यांच्यासारखे तेच व त्यांच्या मोठेपणाला त्यांच्या मोठेपणाचीच उपमा.
बाजीप्रभू, तानाजी यांच्याविषयी – आपल्या पुनरुज्जीवनासाठी लगतचा काळ सोडून जरा मागे होऊन गेलेल्या काळांत दाखविलेल्या उज्ज्वल सद् गुणांना परत बोलावून त्यांनाच विस्तृत रूप दिले पाहिजे... वैभवशाली भूतकाळ ही वैभवशाली भविष्यकाळाची प्रस्तावना, असा नवीन आत्मविश्वास आपल्यात आला आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करून व आपली योग्यता सर्व बाजूंनी वाढवून, ज्ञान, शौर्य व ऐश्वर्य यांनी हिंदुस्थान जगाच्या अग्रभागी पूर्वीप्रमाणे झळकेल असे आपण केले नाही तर थोर पूर्वजांचे नादान वंशज अशी आपली कायमची अकीर्ती होऊन जाईल.
बाळासाहेब खेर यांच्या हस्ते शाळेचे उद् घाटन झाले त्याप्रसंगी मुलांना उद्धेशून नाना – तुमचे हे नगर तीनशे वर्षापूर्वी श्री शिवाजी महाराजांच्या जन्माने क्षणमात्र प्रकाशमान झाले तेवढेच, त्यानंतर सर्व काळोख! येथे स्वातंत्र्यासाठी संग्राम झाले नाहीत. येथे सुंदर मंदिरे बांधण्यात आली नाहीत. येथे कला, कौशल्यांचा उत्कर्ष झाला नाही कि येथे स्फूर्तिदायक वाड्मय निर्माण झाले नाही. हा नाही चा पाढा आता तुम्ही थांबविला पाहिजे. पुढे तुम्हाला राष्ट्राची इमारत उभी करावयाची आहे. चिमुकले राष्ट्रच या ठिकाणी उभे करा. .. हा चिमुकला प्रदेश आरशासारखा स्वच्छ ठेवा. पाच वर्षात या माळाचे जर तुम्ही नंदनवन केले तर पुढेमागे महाराष्ट्राचे व हिंदुस्थानचे नंदनवन करण्याचे सामर्थ्य तुमच्या अंगी खास येईल.
नुसत्या इंग्रजी शाळेत अर्थ नाही. खेड्यांची सर्वांगीण उन्नती होईल अशा तऱ्हेची एखादी सेवासंस्था काढली पाहिजे. असे नानांना अहोरात्र वाटे. गावांजवळील माळरानावर टिकाऊ स्वस्त घरे, शाळा, ग्रंथालय, सभागृह, वर्कशॉप, दवाखाना, छोटेसे न्यायालय व बांधकाम खाते चालवून खेडी स्वयंपूर्ण करण्याचे धोरण असावे. परिस्थितीचा विचार करून काम करणारा शेतकी तज्ञही अशा संस्थेत हवा. पेन्शनर लोकांना, उत्तर आयुष्यात , वानप्रस्थाश्रम स्विकारून अशा तऱ्हेची विनावेतन सेवा सहज करता येण्यासारखी आहे. स्वतःच्या उदाहरणाने नानांनी हे म्हणणे प्रत्यक्षात आचरून दाखविले.
१९४५ साली ऐन युद्धकाळातील महागाईतच नव्या शाळेची इमारत उभी राहिली. त्या वेळी मुलांना उद्धेशून नाना म्हणाले, जे कार्य आपण हाती घेऊ त्यात एकाग्रता असावी. म्हणजे यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे एकाग्रता यशोबीजम हेच विद्यामंदिराचे ध्येयवाक्य झले.
जीवनाशी निगडीत असेल तेच खरे शिक्षण.
आजच्या शिक्षणातील प्रमुख दोष म्हणजे पोषाखी वृत्ती व श्रम न करण्याची खोड. जे राष्ट्र आळसाला थारा देते ते अनेक पंचवार्षिक योजना करून देखील डोके वर काढू शकणार नाही! म्हणून कष्ट आणि श्रम, राष्ट्रीय भावना, सहकार्य, श्रमाच्या रूपाने त्याग व दुसऱ्याच्या आनंदात आंनद मानण्याची वृत्ती असे सुसंस्कृत मन शिक्षणाच्या नव्या मुशीत तयार झाल्याखेरीज राष्ट्राची उन्नती होणे कठीण. खेड्यांचा सर्वागीण उत्कर्ष करणारे शिक्षण हवे.