This scheme is run by the college for the economically poor & needy students since 1996.
To realize the dignity of labor is the main objective of this scheme. Since 1996, University of Pune has taken an initiative to commence the scheme at college level in memory of pioneer Karmaveer Bhaurao Patil. Now Savitribai Phule Pune University is funding 70% of expenditure and the college has to bear 30% of the expenditure under this scheme. In case of backward students & minority students the entire amount, 100%, is reimbursed by the University.
Under this scheme, students have to work for maximum of two hours in a day at a rate fixed by the University. Presently the rate is Rs.30/- per hour.
Under this scheme students are given work in various activities such as: Office work, Field work, Garden work, Cleaning college campus, Library’s book maintenance, Tree plantation, Applying geru & lime to college campus plants, Watering the plants, Digging ditches for plantation, Filling the pots with soil & manure for plantation.
कमवा व शिकवा ही योजना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांसाठी हि योजना सातारा जिल्ह्यात सुरू केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सदर योजना १९९६ पासून अंमलात आणली आहे. ह्या योजनेतून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणास हातभार लागावा हा उद्देश कर्मवीर भाऊराव पाटील यांचा होता. या योजनेत महाविद्यालयातून अनेक गरजू विद्यार्थी सहभाग घेऊन योग्य तो रोजगार मिळवत असून आपले शिक्षण पूर्ण करत असतात. कमवा व शिका या योजनेचा प्रति तास ४५ रुपये मिळतअसून सरासरी एका विद्यार्थ्याला २००० ते २५०० रुपये मिळतात. विद्यार्थ्याना या योजनेत दररोज दोन ते तीन तास काम करता येते. यामधून विद्यार्थ्यंना पैशांबरोबरच कोणते काम कसे करावे याचेही माहिती मिळते. यामधून शेती विकासासाठी कोणती अवजारे वापरावी तसेच कोणत्या प्रकारच्या खतांचा वापर करावा याचेही ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना नवनवीन सघनकिय ज्ञान व महाविद्यालयात चालणाऱ्या विविध कार्यालयीन तसेच विभागातील कामकाज व त्या विभागातील वेगवेगळी माहितीही मिळत असते. तसेच काम करत असताना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्याच विद्यार्थ्यांमधून उत्कृष्ट विद्यार्थी निवडला जातो. तसेच विद्यापीठस्तरीय विद्यार्थिनींना नीलिमाताई पवार हा पुरस्कार मिळत असतो. या योजनेमुळे अनेक गरजू विद्यार्थी हे आपल्या महाविद्यालयात काम करून आपले शिक्षण पूर्ण करून मोठं मोठ्या पदापर्यंत पोहचलेले आहे. तसेच कमवा शिका या योजनेमुळे विद्यार्थ्यांना कष्टाची जाणीव होते. ही योजना सर्वच महाविद्यालंयत कार्यरत आहे. कमवा शिकवा ही योजना फक्त कामच करत नाही तर शिक्षण घेत असताना पूर्ण करता येते या प्रकारे ही योजना कार्य करते. अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन खर्च भागविण्यासाठी याची मदत होते. योजनेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांची चढा ओढ असते. महिनाभर केलेल्या कामाचा हिशोब होऊन किती तास काम केले त्याचे आधारे एकत्रित रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.
Dr. Lahu Gaikwad
Student Welfare Officer
(Dept of History)Amounts spent, amounts received etc chart here