Documents List for Admission

ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नारायणगाव ता. जुन्नर, जि. पुणे

प्रवेशाचे वेळी आवश्यक कागदपत्रे : List of Documents required at the time of admission :

  • शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत, फक्त प्रथम वर्षासाठी)

  • मार्क लिस्ट ची प्रत (मागील परीक्षेची, तृतीय वर्षाच्या TY प्रवेशाच्या वेळी FY ची मार्क लिस्ट)

  • दोन फोटो ** टीप : फोटो कसा असावा याबाबत सविस्तर सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

  • ई मेल आय डी

  • जातीचा दाखला (प्रत)

  • आधार कार्ड प्रत

  • गॅप सर्टीफिकेट (खंड असल्यास)

  • बँक पासबुक झेरोक्स प्रत (राष्ट्रीयीकृत बँकेत स्वतःचे खाते आवश्यक) ** टीप : कोणत्याही फीचा परतावा, कमवा शिका योजनेचे वेतन, शिष्यवृत्तीची रक्कम चेकने किंवा RTGS / NEFT ने अदा केली जाते. (पेमेंट रोख दिले जात नाही). तरी विद्यार्थ्याचे स्वतःचे नावे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

  • अनुदानित तुकडीतील प्रवेशासाठी ज्यांना स्कॉलरशिप/ फ्रीशिप/ ईबीसी/ अन्य शिष्यवृत्ती घ्यावयाची आहे त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या mahadbt या वेबसाईटवर फॉर्म भरून तेथील कागदपत्रांची पूर्तता करून अर्जाची प्रिंट प्रवेश अर्जासोबत जोडून सादर करावी, नाहीतर त्यांना पूर्ण ट्युशन फी भरावी लागेल, फी सवलत मिळणार नाही. याबाबत कार्यालयात चौकशी करून कार्यवाही करावी. (विना अनुदानित तुकडीतील प्रवेशासाठी लागू नाही)

  • SY व TY मध्ये तसेच PG वर्गासाठी प्रवेशाचे वेळी : जर विद्यार्थी अन्य महाविद्यालयातून या महाविद्यालयात प्रवेश घेणार असेल तर Transfer Certificate TC आणावे. जर विद्यार्थी अन्य विद्यापीठातून येत असेल तर त्याने Migration Certificate व Transfer Certificate TC आणावे.

प्रत्येक विद्यार्थ्याकडे प्रवेशाचे वेळी खालील कागदपत्रे असलीच पाहिजेत-

  • शाळा सोडल्याचा दाखला किंवा टी.सी. (याप्रमाणे जन्मतारीख असावी)

  • मार्कलिस्ट (मार्कलिस्टमधील स्पेलिंगप्रमाणेच अर्जात नाव लिहावे, थोडासुद्धा फरक चालणार नाही)

  • जातीचा दाखला (लागू असल्यास)

  • गॅप सर्टीफिकेट (शिक्षणात खंड पडलेला असल्यास)

  • फोटो (पासपोर्ट फोटोच्या निकषाप्रमाणे ** टीप : फोटो कसा असावा याबाबत सविस्तर सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

  • आधार कार्ड (आधार कार्ड प्रमाणे पत्ता असावा. तसेच आधार कार्ड वरील नाव आणि मार्क लिस्ट नाव सारखेच पाहिजे. स्पेलिंगमध्ये फरक नसावा.)

  • राष्ट्रीयीकृत बँकेत स्वतःचे नावे खाते असावे. पासबुकची झेरोक्स प्रत आणावी. त्यामध्ये अकाऊंट नं. व IFSC कोड नं. असावा.

  • इ-मेल आय.डी. (स्वतःचा इ-मेल अकौंट असावा. त्यावर विद्यापीठ, NAAC व महाविद्यालयाकडून संपर्क साधला जातो. परीक्षा फॉर्म, उत्तरपत्रिकांचे पुन:मुल्यांकन इत्यादीसाठी विद्यापीठ इ-मेल वरून संपर्क साधते.)

  • मोबाईल नंबर (तुमचा स्वत:चा व पालकांचा मोबाईल क्रमांक बिनचूक देणे. मोबाईलवर तुम्हाला महत्वाचे तसेच आपत्कालीन कॉल व मेसेज येतील. सिम बदलू नये.)

* कागदपत्रांबाबत महत्वाची सूचना :

आपण महाविद्यालयात दिलेला शाळा सोडल्याचा मूळ दाखला (LC किंवा TC) तुम्हाला कोणत्याही कारणास्तव परत दिला जाणार नाही.

आपल्या महत्वाच्या कागदपत्रांच्या पुरेशा संख्येने झेरॉक्स प्रती काढून ठेवा. (दहा वीस प्रती) शेवटची प्रत राहील तेव्हा त्यावरून पुन्हा झेरॉक्स प्रती काढा. जर आपल्या कडील प्रती संपल्या तर पुन्हा झेरॉक्स प्रत काढण्यासाठी मूळ कागदपत्रांची मागणी महाविद्यालयाकडे करू नये.

सर्व कागद, पावत्या , चिठ्ठ्या जपून ठेवा. कागदपत्रे हरवू नका. आपल्या कागदपत्रांची काळजी घ्या. कागदपत्रे चुरगाळू नयेत यासाठी योग्य फाईल वापरा.

* Important Note regardig documents :

A student must take out sufficient number of xerox copies of his LC or TC before submitting the Original to college office. The originals once submitted will not be given back for any reason.

आपल्या नावातील स्पेलिंग बाबत :

आपल्या नावाचे स्पेलिंग तपासून पहा. प्रवेश अर्जातील आपले नाव, दहावी बारावीच्या मार्क लिस्ट मधील नाव, डिग्री सर्टिफिकेट वरील नाव वगैरे सर्व सारखेच पाहिजे.

टीप:

आपल्या मूळकागद पत्राच्या १०-२० प्रती काढून संग्रही ठेवाव्यात. नंतर केवळ झेरॉक्स प्रती काढण्यासाठी मूळ कागदपत्रे दिली जाणार नाहीत.

Important Note regardig documents :

A student must take out sufficient number of xerox copies of his LC or TC before submitting the Original to college office. The originals once submitted will not be given back for any reason.

फोटो संदर्भात सूचना

ओळखपत्र, परीक्षा व प्रवेश पत्र इत्यादीसाठी तुमचा फोटो आवश्यक असतो. तुमचा फोटो हा पासपोर्टसाठी लागणाऱ्या फोटोच्या निकषानुसार प्रमाणे असावा.

खालील सूचनांकडे लक्ष द्यावे -

  1. फोटो अगदी अलीकडे काढलेला असावा. सहा महिन्यापेक्षा जास्त पूर्वी काढलेला नसावा.

  2. फोटो रंगीत व स्पष्ट असावा.

  3. फोटोचा आकार २”X २”

  4. फोटो समोरून काढलेला असावा. दोन्ही कान फोटोत दिसले पाहिजे. डोळे न झाकता कॅमेऱ्याकडे पाहून फोटो काढावा.

  5. फोटोमध्ये चेहऱ्याचा भाग जास्त पाहिजे. सुमारे ८० टक्के. फोटोत हनुवटी पासून डोक्यावरील केसापर्यंतचे अंतर १” ते १ ३\८” पाहिजे.

  6. बॅकग्राउंड ही पांढरी किंवा ऑफ-व्हाईट पाहिजे.

  7. डोक्यावर टोपी किंवा हॅट नसावी. चष्मा चालेल पण चष्म्याची काच क्लीअर असावी. (टिन्टेड ग्लास नको.), गॉगल घालू नये.

  8. चेहऱ्यावर सर्वसामान्य भाव असावेत. ओठ मिटून किंचित स्मित हास्य चालेल.

  9. फोटो एखाद्या मॉडेलप्रमाणे स्टायलिश नसावा. साधा असावा.

  10. केशभूषा फॉर्मल असावी. मुलांनी साधा हेअर कट करून भांग पाडवा. मुलींनी केस बांधून वेणी घालून फोटो काढावेत. सिनेमातील नट-नट्या प्रमाणे मोकळे सोडलेल्या केसांची हेअरस्टाईल नसावी.

* वर दिलेल्या सर्व सामान्य सूचनांचा तारतम्याने अवलंब करावा *