पुणे विद्यापीठाच्या आरोग्य विभागाने निर्देशित केल्याप्रमाणे प्रथम वर्षातील आणि वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येते.
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार वैद्यकीय तपासणीला उपस्थित राहून तपासणी करून घेणे सक्तीचे असून विद्यार्थ्यांच्या हिताचे असते.
या वैद्यकीय तपासणीत आढळणारे शारिरीक दोष, आजार दूर करण्याचे मार्ग वेळीच समजतात आणि वेळच्या वेळी उपाय योजना होण्याच्या दृष्टीने तजवीज करता येते.
या तपासणीत अनुपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा पात्रता दाखला मिळणार नाही व त्याअभावी वार्षिक परीक्षेत बसता येणार नाही.