Miscellaneous Office Letters, Notices, Policy Letters,
Circulars, Downloads etc.
Advances Settlement Rules आगाऊ रकमांचा हिशोब देण्याबाबत नियम
ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे
हिशोब पूर्ण करण्यासंदर्भात सूचना :
बिले ही खरेदीनंतर लवकरात लवकर द्यावीत. ऑगस्ट महिन्यातील बिले मार्च महिन्यात दिली जातात असे निदर्शनास आले आहे. याबाबत विलंब करू नये.
अॅडव्हान्स साठी पूर्व नियोजन करून अर्ज करून ठेवावा. कार्यक्रमाचे आधी अॅडव्हान्सची रक्कम चेकने देण्यात येईल.
कार्यक्रमानंतर एका आठवड्याचे आत हिशोब पूर्ण करावा.
अॅडव्हान्स सेटल करण्यासाठी फॉर्म वापरावा. सर्व बिले ही तारखेनुसार क्रमाने लावून घ्यावीत. त्यांची संक्षिप्त यादी फॉर्ममध्ये लिहावी. शेवटी बेरीज करून रक्कम शिल्लक, जादा केलेला खर्च, वगैरे लिहावा.
रोखीचे व्यवहार हे अपरिहार्य असेल तेव्हाच करावेत. शक्यतो सर्व पेमेंट्स चेकनेच अदा करावीत. त्यासाठी बँक खाते असणारे पुरावठादारांबरोबरच व्यवहार करावेत. चेक लिहिणे, ते बँकेत जमा होऊन हातात रक्कम मिळणे यासाठी वेळ लागतो. तेव्हढे थांबण्याची तयारी असणारे पूरवठादारांबरोबरच व्यवहार करावेत.
जेथे चेकने पेमेंट करता येणे शक्य आहे तेथे रोख अॅडव्हान्स दिला जाणार नाही.
बिले व पावत्यांबाबत :
बिले छापील असावीत. पक्की बिले घ्यावीत. त्यासाठी टॅक्स आकारणी झाली तरी चालेल.
बिलावर नम्बरिंग, तारीख, नगसंख्या, दर, एकूण रक्कम, रोख मिळाल्याचा शेरा, किंवा बाकी असल्याचा शेरा, सही इ. असले पाहिजे. बिलामध्ये खाडाखोड नसावी, शाईचा बदल, हस्ताक्षरातील बदल, इ. नसावा.
चेकने पेमेंट केल्यावर त्याची पोहोच घेऊन जोडावी.
रु.१००० पेक्षा अधिक रक्कमेच्या खरेदीसाठी कोटेशन पद्धती अवलंबावी. किमान तीन कोटेशन्स आवश्यक. त्याचा तुलनात्मक तक्ता जोडावा. त्यावर मंजुरीची सही प्राचार्य व मॅनेजमेंट सदस्यांची असावी.
रु.५००० हून अधिक रक्कमेच्या पावतीवर/व्हाऊचरवर रेव्हेन्यू स्टँप लावून सही केलेली असावी.
- - प्राचार्य
Indemnity Form
सेवापुस्तिकेतील महत्वाच्या नोंदी : चेक लिस्ट
Service Book Checklist
सेवापुस्तक अद्ययावत करताना खालील बाबींच्या नोंदी केलेल्या आहेत किंवा नाही हे तपासून पाहावे व नसतील तर तशा नोंदी घेऊन सेवापुस्तक अद्ययावत करावेत.
पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद पडताळणी.
पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी तपासणी करून प्रमाणित करणे.
वैद्यकीय दाखल्यांची नोंद.
जात पडताळणी बाबतची नोंद.
भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद.
निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद.
मृत्यू अन सेवानिवृत्त्ती उपदान नामनिर्देशनाची नोंद.
गटविमा योजनेच्या सदस्यत्वाची नोंद.
गटविमा योजनेच्या वर्गणीची नोंद. (सुरुवातीची व वेळोवेळी बदलानुसार)
गटविमा नामनिर्देशनाची नोंद.
विहित संगणक अहर्ता परीक्षा उत्तीर्ण नोंद.
सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद.
वार्षिक वेतनवाढ नोंद.
वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्र. ८ मध्ये कर्मचार्यांची स्वाक्षरी.
नाव बदलाची नोंद.
बदली/ पदोन्नती/ अन्य नियुक्ती आदेशाची नोंद.
बदली/ पदोन्नती/ अन्य नियुक्तीनुसार कार्यमुक्त/ हजर/ पदग्रहण अवधी नोंद.
सेवेत कायम केल्याची नोंद.
स्वग्राम घोषणपत्राची नोंद.
वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती नोंद व पडताळणीची नोंद.
पदोन्नती/ आश्वासित प्रगती योजना/ एकस्तर यामुळे झालेल्या वेतननिश्चितीची नोंद.
पुरस्कार प तद् नुशांगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी.
अर्जित/ परावर्तीत रजा दर सहामाही केल्याची नोंद.
घेतलेल्या रजेच्या आदेशाची नोंद व रजा लेख्यात खर्ची घातल्याची नोंद.
रजा प्रवास सवलत नोंद.
दुय्यम सेवापुस्तक दिल्याबाबतची नोंद.
मानीव दिनांक/ वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी.
सेवा पडताळणीची नोंद.
जनगणना रजा नोंद.
सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण.
सहल बंदी बाबत सूचना
विद्यार्थांचे गैरवर्तन, संभाव्य अपघात, पालकांच्या तक्रारी इत्यादी बाबत विचार करून महाविद्यालयाने सर्व सहली बंद केल्या आहेत. त्यास पाच वर्ष होऊन गेली आहेत. (अपवाद म्हणून अभ्यासक्रमाचे दृष्टीने आवश्यक असेल तेथे केवळ एका दिवसाच्या क्षेत्र भेटीसाठी विहित कार्यपद्धती अवलंबून परवानगी दिली जाते.)
महाविद्यालय माहिती पुस्तिका, प्राचार्यांचे शिस्ती विषयीचे अभिभाषण इत्यादीमधून सहली काढल्या जाणार नाहीत हे दरवर्षी स्पष्ट केले जाते.
तरीसुद्धा काही प्राध्यापकांनी खाजगीरीत्या विद्यार्थ्याची दीर्घ काळाची व दीर्घ पल्ल्याची सहल काही वर्षांपूर्वी आयोजित केली आहे असे निदर्शनास आले आहे. प्राचार्यांच्या परवानगीशिवाय महाविद्यालयाचे विद्यार्थी सहलीला घेऊन जाणे संस्थेच्या व महाविद्यालयाच्या धोरणांशी विसंगत वर्तन आहे.
अशाप्रकारे सहल आयोजित केल्यावर पालकांचा असा गैरसमज होईल की, महाविद्यालयाने ती आयोजित केली आहे.
इतर विद्यार्थ्यांना असे वाटेल की, सहलीवरील बंदी उठविण्यात आली आहे. व आता परवानगी मिळते.
सदर सहलीसोबत जे प्राध्यापक खाजगी रित्या गेले आहेत ते मोठी रिस्क घेत असतात. काही गैर घडल्यास संस्थेचे व महाविद्यालयाचे नावास गालबोट लागण्याची शक्यता आहे.
प्राचार्यांचे परवानगीशिवाय काढलेल्या सहलीसाठी प्राचार्य रजामंजूर करणार नाहीत. कारण खाजगी सहल, पर्यटन, मुला मुलींच्या गटाला फिरायला घेऊन जाणे, त्यांच्या मौजमजेत सहभागी होणे हा काही महाविद्यालयाचा कार्यक्रम (अजेंडा) नाही.
प्राध्यापकांनी कोणत्याही प्रकारची सहल प्राचार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय आयोजित करू नये. पूर्व परवानगीशिवाय सहलीची वर्गणी स्वतःकडे किंवा विद्यार्थ्यांकडे गोळा करू नये.
विद्यार्थ्यांनी परस्पर सहल आयोजित केली असेल तर त्यासोबत जाऊ नये.
पूर्व परवानगी शिवाय आयोजित केलेल्या सहलीसंदर्भातील कोणत्याही गोष्टीस महाविद्यालय अगर संस्था जबाबदार राहणार नाही.
सदर सूचनेचे उल्लंघन केलेले आढळून आल्यास संबंधित प्राध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
-- प्राचार्य
विविध वस्तूंचे विक्रेते, पुस्तकांचे विक्रेते, फेरीवाले, जादूगार, नाट्यछटा, किंवा एकपात्री कार्यक्रम करणारे, अपंग, अंध, मुके, बधिर इत्यादी मदत/भिक मागणारे, ऐनवेळी भाषण देण्यासाठी येणारे आणि विविध प्रकारे आर्थिक मदत मागण्यास येणारे इत्यादी संदर्भात सूचना
फेरीवाले
विविध वस्तूंचे विक्रेते
पुस्तकांचे विक्रेते
जादूगार, नाट्यछटा, किंवा एकपात्री कार्यक्रम करणारे
अपंग, अंध, मुके, बधिर इत्यादी मदत/भिक मागणारे
ऐनवेळी भाषण देण्यासाठी येणारे आणि
विविध प्रकारे आर्थिक मदत मागण्यास येणारे इत्यादी
विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम किंवा सेमिनार, प्रेझेंटेशन, क्लासची जाहिरात, ट्रेनिंग ची जाहिरात करण्यासाठी येणारे
बँक, विमा, आरोग्य योजना, कर्ज योजना इत्यादीसाठी येणारे
वरील प्रमाणे व्यक्ती महाविद्यालयामध्ये नेहमी येत असतात. अशा अनाहूत व्यक्तींना परवानगी न देण्याचे महाविद्यालयाचे धोरण आहे. कारण त्यामुळे अध्यापनात व्यत्यय येतो.
अशा व्यक्तींनी प्रथम प्राचार्यांना भेटून चर्चा करावी. योग्य वाटल्यास प्राचार्य परवानगी देतील व लेखी सूचना काढून स्टाफला सहकार्य करण्याबाबत सूचित करतील.
अशा प्रकारची व्यक्ती महाविद्यालयात वर्गावर आलीच तर त्याचेकडे प्राचार्यांची लेखी परवानगी असेल तरच त्यास सहकार्य करावे.
प्राचार्यांची लेखी परवानगी नसेल तर अशा व्यक्तीला महाविद्यालयात थांबू देऊ नये. ते अन्य विभागात जाऊन ट्राय करतील. तसे होऊ नये म्हणून ते बाहेर निघून जातील असे पहावे.
गेटवरील वॉचमन व कौंटरवरील सेवक यांनी सुरुवातीलाच त्यांना रोखावे.
सर्व प्राध्यापक व सेवक यांनी या सूचनेप्रमाणे जरूर ती कार्यवाही करावी.
--- प्राचार्य
सर्व महिला प्राध्यापकांसाठी पोशाखाविषयी सूचना DRESS CODE for Ladies Teachers
महाविद्यालयातील ज्येष्ठ महिला प्राध्यापकांच्या सभेमध्ये प्राप्त झालेल्या सूचनांचा विचार करून खालीलप्रमाणे कळवीत आहोत –
महिला प्राध्यापकांनी शक्यतो साडी परिधान करावी.
किंवा ओढणी सह पंजाबी ड्रेस परिधान करावा.
किंवा पॅन्ट, शर्ट, टॉप व त्यावर स्टोल किंवा ब्लेझर, जॅकेट इत्यादी परिधान करावे.
स्लीव्हलेस, फाटक्या विटलेल्या जीन्स, लेगिन्स ई. परिधान करण्यास मनाई आहे.
महाविद्यालयाच्या अगर संस्थेच्या आवारात असतांना सदर पोषखाबाबत सूचनांचे पालन केले जावे.
--प्राचार्य
Leaves: Rules for Non-grant Section : विना अनुदान विभागासाठी रजा नियम
कार्यालयीन आदेश दि. ३१/०३/२०१८
विषय : विना अनुदान विभागासाठी रजा नियम
रजांचे प्रकार :
किरकोळ रजा Casual Leave : अनुदानित प्रमाणे नियम लागू, कमाल ८ दिवस
कर्तव्य रजा Duty Leave : अनुदानित प्रमाणे नियम लागू
वैद्यकीय रजा Sick / Medical Leave : अनुदानित प्रमाणे नियम लागू, कमाल १० दिवस
असाधारण रजा Extra Ordinary Leave
विनावेतन Leave without Pay LWP
पर्यायी सुट्टी Substitute Leave
किरकोळ रजा Casual Leave
Casual leave या शब्दाचे मराठी भाषांतर नैमितिक रजा किंवा किरकोळ रजा असे केले जाते. Casual म्हणजे निर्हेतुक (unintentional) अनपेक्षित (unexpected) अपघाती (accidental) असा शिक्षक कर्मचाऱ्याच्या आवाक्याबाहेर तसेच निकडीच्या वेळी काढावी लागणारी रजा असे या रजा प्रकारचे वर्णन करता येईल.
कामावर अनुपस्थित राहण्यास दिलेली परवानगी म्हणजे रजा.
प्राचार्यांकडे अर्ज करून तो मंजूर झाल्यावरच रजा उपभोगता येते.
हक्क म्हणून रजा मागता येत नाही.
एकाच वेळी कितीजण रजा मागत आहेत, कामाची निकड, परीक्षा, विद्यापीठ समितीचे कामकाज, सर्व रजा उपभोगुन संपविण्याची प्रवृत्ती इत्यादी विचारात घेऊन रजा नाकारली जाऊ शकते किंवा रद्द केली जाऊ शकते.
रजा काळात आपल्या तासांचे, अन्य कामाचे आगाऊ समायोजन करणे. फोनवरून सहकाऱ्यांना कल्पना देणे, इत्यादी अपेक्षित आहे.
वैद्यकीय रजा Sick / Medical Leave
गंभीर स्वरूपाच्या आजारपणाकरिता दोन किंवा अधिक दिवसाकरिता उपचार व विश्रांती घ्यावी लागते, रुग्णालयात दाखल व्हावे लागते अशावेळी वैद्यकीय रजा घ्याव्यात.
किरकोळ एक दिवसाच्या आजारासाठी वैद्यकीय रजेऐवजी किरकोळ रजा घ्यावी.
वैद्यकीय रजांचे रुपांतर किरकोळ रजेमध्ये करता येणार नाही.
आजारपणामुळे महाविद्यालयात येऊ शकत नाही असे स्पष्ट झाल्यास आपले विभागप्रमुख, सहकारी प्राध्यापक व प्राचार्य यांना फोन वरून अगर मेसेज पाठवून कल्पना देणे आवश्यक आहे.
पुनः रुजू होतांना डॉक्टरांचे सर्टिफिकेट, फिटनेस सर्टिफिकेट जोडून प्राचार्यांना समक्ष भेटून अर्ज द्यावा.
वैद्यकीय रजाबाबत प्राचार्य व अधिक्षक हे योग्य ती छाननी करून निर्णय देतील तो बंधनकारक राहील. चौकशीमध्ये काही खोटेपणा आढळून आल्यास रजा नामंजूर/विनावेतन केली जाईल. म्हणून आपल्या आजाराबाबत केलेल्या चाचण्या, औषध खरेदी पावत्या इत्यादी मागणी केल्यास सादर करावे लागेल.
कर्तव्य रजा Duty Leave
महाविद्यालयाशी संबंधित, आपल्या प्रोफेशनशी संबंधित, आपल्याला अन्यत्र कर्तव्य पार पडायचे असेल, किंवा तसा आदेश दिला असेल तर आपण कामाचे ठिकाणी अनुपस्थित राहण्यास परवानगी दिली जाते त्यास Leave of Absence किंवा Duty Leave म्हणजेच कर्तव्य रजा म्हणतात.
अर्जासोबत आदेशाची प्रत, निमंत्रण पत्र, इत्यादी जोडावे. तसेच काम संपल्यावर तेथील अधिकाऱ्याने दिलेले उपस्थिती प्रमाणपत्र सादर करावे.
कर्तव्य रजेचा कालावधी हा प्राचार्यांनी मंजूर केल्याप्रमाणे असेल. महाविद्यालयात गरज असेल तर प्राचार्य आदेश देतील तेव्हा रजा समाप्त करून महाविद्यालयात रुजू व्हावे लागेल.
पर्यायी रजा / सुट्टी Substitute Leave/ Holiday
फक्त शिक्षकेतर सेवकांना देय आहे. महाविद्यालयाने सुट्टीच्या दिवशी काम करण्याचे नियोजन केले असेल, तसा आदेश काढला असेल तर त्याची पर्यायी सुट्टी शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना दोहोंना नंतर देण्यात येईल.
विनावेतन रजा Leave without Pay LWP
ज्या महिन्यातील रजा असेल त्या महिन्यातील दिवस विचारात घेऊन प्रति दिन वेतन काढले जाईल, नियमानुसार round-up किंवा round-down करून कपात केली जाईल. वेतन कपातीबाबत लेखी सूचना संबंधितास दिली जाईल. वर्ष अखेरीस माहे एप्रिलमध्ये एकदम सर्व कपाती केल्या जातील.
-प्राचार्य
________________________________
ग्रामोन्नती मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविदयालय, नारायणगाव
सुचना दि.१४/०६/२०१९
मेडिकल रजा संबंधी कार्यवाही
विना अनुदानित विभागातील कर्मचाऱ्यांना नियमानुसार वैद्यकीय कारणाकरिता रजा अनुज्ञेय आहेत. तथापि सदर रजांचा दुरुपयोग केला जाऊ नये यासाठी दक्षता म्हणुन खालीलप्रमाणे कार्यवाही करावी असे सूचित करीत आहोत.
आजारपणामुळे महाविद्यालयात येऊ शकत नसल्यास तसे आपले सहकारी व वरिष्ठ यांना फोन वरून किंवा मेसेज करून पहिल्याच दिवशी कळवावे. व्हाटसॅप ग्रुपवर मेसेज टाकावा. ज्या सहकाऱ्याला सदर फोन येईल त्याने फोन मेसेज स्लीप भरून ती प्राचार्यांकडे पाठवावी.
शक्यतो घरून अर्ज महाविद्यालयात पाठवावा. अर्जामध्ये आजारपणाचे स्वरूप आणि अंदाजे किती कालावधीसाठी रजेची आवश्यकता आहे याची माहिती द्यावी.
आजारपणाची रजा संपल्यावर कामावर रुजू होताना सोबत डॉक्टर चा दाखला तसेच टेस्ट रिपोर्ट, बिले इत्यादी असेल ते कागदपत्रे सोबत दाखविण्यास आणावे. सकाळीच प्राचार्यांची/कार्यालय प्रमुखांची भेट घेऊन त्यांना वरील कागदपत्रे दाखवावीत व रजा मंजूर करून घ्यावी.
कागदपत्रे दाखल करण्यास विलंब केल्यास रजा नामंजूर केली जाऊ शकते.
तरी सर्वानी नोंद घेऊन कार्यवाही करावी.
-प्राचार्य
------------------------------------------------------------
सूचना
फक्त विनाअनुदानित विभागासाठी
जास्तीच्या रजा व गैरहजेरी विनावेतनी करण्याबाबत
दिनांक १ मे. २०१९ पासून रजासंदर्भात तत्परतेने कार्यवाही करण्याची सूचना देत आहोत. त्यापूर्वीच्या वर्षातील कार्यवाही करण्यास स्थगिती देत आहोत.यापुढे दर महिन्याला रजांचा हिशोब करून कार्यवाही करावी.
१ मे, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि ललिता पंचमी या दिवसांना उपस्थित राहणे अनिवार्य आहे. सदर दिवसांची अनुपस्थिती हि विनावेतनी समजण्यात येईल किंवा रजा शिल्लक असल्यास रजा समजण्यात येईल.
वैद्यकीय रजा या केवळ आजारपणाकरताच वापरण्यात याव्यात. आपली काही अडचण असल्यास प्राचार्यांना भेटावे व त्यांच्या निर्णयानुसार वैद्यकीय रजेचे रुपांतर अन्य रजेमध्ये करण्याची कार्यवाही केली जाईल.
वैद्यकीय रजांचा दुरुपयोग टाळण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.
४.१. आजारी पडलेल्या दिवशी लवकरात लवकर लेखी अर्ज प्राचार्यांकडे पोहोच करावा. किंवा एस.एम.एस. किंवा व्हॉट्सप मेसेज करावा आणि/ किंवा प्राचार्य किंवा अधीक्षक यांना फोन करावा. अर्जामध्ये किंवा मेसेजमध्ये आजाराचे स्वरूप नमूद करावे.
४.२. आजारपणानंतर महाविद्यालयात रुजू होताना डॉक्टरांचे सटिफिकिट जोडून रीतसर अर्ज प्राचार्यांकडे द्यावा. शिवाय आजारपणासंदर्भातील डॉक्टरांची औषधयोजना (प्रिस्क्रिप्शन), औषध खरेदीच्या पावत्या, टेस्ट रिपोर्ट्स यापैकी जे असेल ते दाखवून खात्री पटवून द्यावी. रजांचे बाबतीत प्राचार्यांनी दिलेला निर्णय अंतिम असेल.
प्राचार्य
Vacational Staff Holidays etc व्हेकेशनल स्टाफ रजा/सुट्ट्या इ.बाबत
सूचना
व्हॅकेशनल शिक्षेकेतर कर्मचार्यांना शिक्षकांप्रमाणे सुट्या असतील.
सदर स्टाफच्या रजा या कॅलेडर वर्षाप्रमाणे मोजल्या जातील .
ज्यावेळी पूर्ण महाविद्यालयास सुट्टी असेल त्यावेळी अॅफीसची ड्युटी करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना मस्टरवरील क्रमानुसार काम करावे लागेल. काही वेळा नाइट वॉचमन रजेवर असतो त्यावेळी नाईट ड्युटी सुद्धा करण्यास सांगितले जाईल, त्याबद्दल संबधित कर्मचार्याला पर्यायी रजा दिली जाईल.
त्याचपणे संस्थेच्या सभा व कार्यक्रमासाठी सुद्धा कामावर बोलावले जाईल.
व्हॅकेशनल स्टाफला व्हॅकेशनमध्ये कामावर बोलावल्यास त्याबद्दल पर्यायी रजा दिली जाईल.
ज्यावेळी शिक्षकेतर कर्मचार्यांना सुट्टी असेल आणि महाविद्यालय सुरु असेल त्यावेळी व्हॅकेशनल स्टाफने मस्टरवरील क्रमानुसार ओफिस ड्युटी सांभाळावी.
जर क्रमानुसार एखाद्याच्या ड्युटी असेल परंतु वैयक्तिक कारणामुळे त्याला हजर राहता येत नसेल तर त्यासाठी एकमेकांमध्ये पर्यायी व्यवस्था करावी. याबाबत काही वाद निर्माण झाल्यास कार्यालय अधीक्षकांनी हस्तक्षेप करावा.
नाईट हॉलीडे ड्युटी रजिस्टर कार्यालयामध्ये ठेवलेले असून ते ड्युटीवरील कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित भरून स्वाक्षरी करणे बंधनकारक आहे.
याबद्दल आपले काही म्हणणे असल्यास लेखी स्वरुपात १० दिवसांचे आत कळवावे.
-प्राचार्य (जुन २००९)
Code of Professional Ethics for University and College Teachers प्राध्यापकांसाठी आदर्श आचार संहिता :
Code of Professional Ethics for University and College Teachers
(as published in the Statutes of Savitribai Phule Pune University )
Teaching is a sacred profession. It is rather a sacred service than a profession. Any profession demands for its worthy existence, acceptance and enforcement of code of ethics which make the profession self-regulating, self-governing and self-satisfying. Teacher professional ethics mean a set of dignified principles put into practice by the Teachers. They are the valuable tactics that are exhibited and enforced by Teachers in relation to the students, colleagues, community and to oneself, to produce a profound effect on strategy of education.
Why Code of Professional Ethics?
to define accepted/acceptable behaviors;
to promote high standards of practice;
to provide a benchmark for members to use for self-evaluation;
to establish a framework for professional behavior and responsibilities;
as a vehicle for occupational identity;
as a mark of occupational maturity;
The UGC set up a task force for preparing a Code of Ethics for University and college teachers. With participation of AIFUCTO a report on the Code was prepared and it was adopted by the Commission in its meeting on 27th December 1988. The same was adopted by Pune University and it is reproduced below:
The Code of Professional Ethics
Preamble
I. Goal of Higher Education in our Country:
The basic purpose of education is to create skill and knowledge and awareness of our glorious national heritage and the achievements of human civilization, possessing a basic scientific outlook and commitment to the ideals of patriotism, democracy, secularism and peace, and the principles enunciated in the Preamble to our constitution.
Higher education has to produce leaders of society and economy in all areas of manifold activities with a commitment to the aforesaid ideals.
Higher education should strive for academic excellence, and progress of arts and science. Education, research and extension should be conducted in conformity with our national needs and priorities and ensure that our best talents make befitting contributions to international endeavor on societal needs.
II. Teachers and their Rights:
Teachers should enjoy full civic and political rights of our democratic country Teachers have a right to adequate emoluments, social position, just conditions of service professional independence and adequate social insurance.
I. Teachers and Their Responsibilities:
Whoever adopts teaching as a profession assumes the obligation to conduct him in accordance with the ideals of the profession. A teacher is constantly under the scrutiny of his students and the society at large. Therefore, every teacher should see that there is no incompatibility between his precepts and practice. The national ideals of education which have already been set forth and which he/she should seek to inculcate among students must be his/her own ideals. The profession further requires that the teachers should be calm, patient and communicative by temperament and amiable in disposition.
Teachers should:
1. adhere to a responsible pattern of conduct and demeanor expected of them by the community;
2. manage their private affairs in a manner consistent with the dignity of the profession;
3. seek to make professional growth continuous through study and research;
4. express free and frank opinion by participation at professional meetings, seminars, conference etc. towards the contribution of knowledge;
5. maintain active membership of professional organizations and strive to improve education and profession through them;
6. perform their duties in the form of teaching, tutorial, practical and seminar work conscientiously and with dedication;
7. co-operate and assist in carrying out functions relating to the educational responsibilities of the college and the university such as: assisting in appraising applications for admission, advising and counseling students as well as assisting in the conduct of university and college examinations, including supervision, invigilation and evaluation; and
8. participate in extension, co-curricular and extra-curricular activities including community Service.
II. Teachers and the Students:
Teachers should:
1. respect the right and dignity of the student in expressing his/her opinion;
2. deal justly and impartially with students regardless of their religion, caste, political, economic, social and physical characteristics;
3. recognize the difference in aptitude and capabilities among students and strive to meet their individual needs;
4. encourage students to improve their attainments, develop their personalities and at the same time contribute to community welfare;
5. inculcate among students scientific outlook and respect for physical labor and ideals of democracy, patriotism and peace;
6. be affectionate to the students and not behave in a vindictive manner towards and of them for any reason;
7. pay attention to only the attainment of the student in the assessment of merit;
8. make themselves available to the students even beyond their class hours and help and guide students without any remuneration or reward;
9. aid students to develop an understanding of our national heritage and national goals, and
10. refrain from inciting students against other students, colleagues or administration
III. Teachers and Colleges:
Teachers should:
1. treat other members of the profession in the same manner as they themselves wish to be treated;
2. speak respectfully of other teachers and render assistance for professional betterment;
3. refrain from lodging unsubstantiated allegations against colleagues to higher authorities;
4. refrain from allowing considerations of caste, creed, religion, race or sex in their professional endeavour.
IV. Teachers and Authorities:
Teachers should:
1. discharge their professional responsibilities according to the existing rules and adhere to procedures and methods consistent with their profession in initiating steps through their own institutional bodies and/or professional organizations for change of any such rule detrimental to the professional interest;
2. refrain from undertaking any other employment and commitment including private tuitions and coaching classes which are likely to interfere with their professional responsibilities;
3. co-operate in the formulation of policies of the institution by accepting various offices and discharge responsibilities which such offices may demand;
4. co-operate through their organizations in the formulation of policies of the other institutions and accept offices;
5. co-operate with the authorities for the betterment of the institutions keeping in view the interest and in conformity with dignity of the profession;
6. should adhere to the conditions of contract;
7. give and expect due notice before a change of position is made; and
8. refrain from availing themselves of leave except on unavoidable grounds and as far as practicable with prior intimation, keeping in view their particular responsibility for completion of academic schedule.
V. Teachers and Non-Teaching Staff:
1. Teachers should treat the non-teaching staff as colleagues and equal partners in a co-operative undertaking, within every educational institution;
2. Teachers should help in the function of joint staff-councils covering both teachers and the nonteaching staff.
VI. Teachers and Guardians:
Teachers should:
Try to see through teachers’ bodies and organizations that institutions maintain contact with the guardians of their students, send reports of their performance to the guardians whenever necessary and meet the guardians in meetings convened for the purpose for mutual exchange of ideas and for the benefit of the institution.
VII. Teachers and Society:
Teachers should:
1. Recognize that education is a public service and strive to keep the public informed of the educational programs which are being provided;
2. Work to improve education in the community and strengthen the community's moral and intellectual life;
3. Be aware of social problems and take part in such activities as would be conducive to the progress of society and hence the country as a whole;
4. Perform the duties of citizenship, participate in community activities and shoulder responsibilities of public offices;
5. Refrain from taking part in or subscribing to or assisting in any way activities which tend to promote feeling of hatred or enmity among different communities, religions or linguistic groups but actively work for National Integration.
_____________________________________
प्राध्यापकांसाठी शिस्त विषयक सूचना Discipline Rules :
महाविद्यालयात स. ७.४५ वाजता उपस्थित राहावे. (
पहिल्या तासाला ५ मिनिटे अगोदर वर्गासमोर उभे राहावे आणि बरोबर ८ वा. वर्गात जाणे.
वर्गामध्ये शिकविन्यापूर्वी परिपूर्ण तयारी करावी.
सलग ४५ मि. बोलण्याची तयारी करावी.
गैरहजर प्राध्यापकांच्या तासाला संबंधीत प्राध्यापकांचा अभ्यासक्रम पुढे चालू ठेवावा किंवा आपले स्वतःचे व्याख्यान द्यावे.
वर्गामध्ये प्रवेश केल्यावर ताबडतोब शिकविण्यास सुरुवात करावी.
वर्गामध्ये प्राध्यापक असताना विद्यार्थ्यांचा बाहेर आवाज येता कामा नये. वर्गाची शिस्त पाळा. Class control is very important.
डायरी लेखन रोज करावे.
सर्वांनी Commerce Staff Academy मध्ये स्वतःहून सहभाग घ्यावा.
वाणिज्य विभागातील सर्व उपक्रमामध्ये स्वतःहून सहभाग घ्यावा.
वाणिज्य विभागातील सर्व कामे स्वतःहून एकत्र येऊन पुन करावी.
वाणिज्य विभागाचा अंतर्गत गुणवत्ता विकास होण्यासाठी सुधारणा लेखी कळवाव्यात.
अ, ब, क तुकडीनुसार निकालाची संपूर्ण जबाबदारी संबंधीत प्राध्यापकाची राहील.
वेळोवेळी विभागप्रमुख व समन्वयक यांनी दिलेल्या तोंडी आदेशाची अंमलबजावणी करावी.
आपणास दिलेली जबाबदारी तोंडी आदेशान्वये पूर्ण न केल्यास लेखी आदेश दिला जाईल.
नेहमी सद्वर्तनी असण्याबाबत : आदर्श आचार संहिता नुसार विशेष सूचना
Keeping Good Conduct always : Special instructions vis-a-vis Code of Conduct
सूचना
विद्यापीठ आणि आणि यु जी सी यांनी लागू केलेल्या आदर्श आचार संहिते प्रमाणे महाविद्यालयात कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. जात-पात, वर्ण, धर्म, लिंग इत्यादी बाबतीत कोणताही भेदभाव केला जात नाही. त्यामुळे महाविद्यालयातील वातावरण सलोख्याचे आणि सौहार्दाचे राहते. चांगल्या प्रकारे टीम वर्क घडून येण्यासाठी तेआवश्यक आहे.
We have adopted The principle of non-discrimination which seeks “to guarantee that human rights are exercised without discrimination of any kind based on race, colour, sex, language, religion, political or other opinion, national or social origin, property, birth or other status such as disability, age, marital and family status, sexual orientation and gender identity, health status, place of residence, economic and social situation”.
महाविद्यालयामध्ये कोणीही जातीवाचक शब्दांचा उपयोग करू नये. जातीवाचक शब्द वापरून शेरेबाजी करणे, चिडवणे, हिणवणे, अपमानास्पद वागणूक देणे या गोष्टी निषिद्ध आहेत. कोणीही असे वर्तन करू नये. आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये जात विषयक बाबी कोणत्याही प्रकारे येता कामा नयेत. कोणाच्याही जात-पात इत्यादीचा उल्लेख करण्याची काहीच आवश्यकता नाही. जात-पात विषयक विचारसरणी महाविद्यालयातून हद्दपार करण्यात आलेली आहे. तरीसुद्धा जर कोणी जातीविषयक गैरवर्तन (बोलण्यामधून, वर्तनामधून, कृतीमधून इत्यादी) करीत असेल तर त्याची गंभीर दखल घेऊन समज दिली जाईल आणि/किंवा कायद्यानुसार कारवाई केली जाईल. जात विषयक सूचनांचा वरील प्रमाणे अवलंब करून सहकार्य करावे.
महाविद्यालयात सर्वांनी एकमेकांना आदराने वागवावे. कुणाचाही आदर व उपमर्द होऊन ते अपमानित होतील अशी भाषा वापरणे अगर वर्तन करणे टाळावे. नेहमी सभ्य भाषेतच बोलावे. असभ्य शब्दांचा उपयोग करू नये. आपले काही काम झाले नाही तर त्यावर चिडून जातीवाचक/ लिंग वाचक शब्दांचा उपयोग करून शिवराळ भाषा वापरू नये. सभ्य भाषेत बोला. हळू आवाजात बोला. शिवीगाळ करू नका.
एकमेकांचा आदर ठेवावा. कोणाचाही अनादर किंवा अपमान करू नये.
लूज टॉक करू नये. टोमणे, शेरेबाजी, तिरकस वक्तव्ये करू नयेत. कुणाची त्याच्या माघारी चर्चा करू नये. जबाबदारीने बोलावे. अफवांना जागेवरच थांबवावे.
एखाद्या प्राध्यापकास विद्यार्थी अडचणीत आणीत असतील तर विद्यार्थ्यांना चिथावणी न देता प्राध्यापकाला सपोर्ट केले पाहिजे. बाह्य शक्ती विरोधात आपली एकी पाहिजे.
विद्यार्थ्यांच्या आपापसातील मारामाऱ्या, भांडणे इत्यादी थांबवण्याचे काम करावे.
परीक्षेत कॉपीबंदी, गैर प्रकारांचा अवलंब न करणे इत्यादी महाविद्यालयाची धोरणे लक्षात घेता कोणीही प्राध्यापकाने किंवा सेवकाने विद्यार्थ्यांना सदर कामी सहाय्य करू नये.
वरील सूचना महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे एकमेकातील वर्तन, कर्मचारी आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी, पालक यांचे एकमेकातील वर्तन यास लागू आहेत याची नोंद घ्यावी.
वरील सूचनांचे उल्लंघन केल्यास आणि त्यामुळे महाविद्यालयांमध्ये तेढ निर्माण झाल्यास त्यातून उद्भवणाऱ्या समस्याना संबंधित व्यक्ती जबाबदार असेल. त्याचप्रमाणे अशा प्रकरणांमध्ये पोलिसांमध्ये तक्रार होणे अगर गुन्हा दाखल होणे यासारख्या गोष्टी घडू शकतात याची पूर्वकल्पना देत आहोत.
वरील सूचनांच्या संदर्भात कुठे काही गैरवर्तन घडत असेल तर त्याची कल्पना मा.प्राचार्य यांना भेटून वा फोन करून द्यावी, जेणेकरून अशा गोष्टींमुळे समस्या निर्माण होऊन त्यांनी मोठे व गंभीर स्वरूप धारण करण्याआधीच काही उपाय योजना करणे शक्य होईल.
--- प्राचार्य
Downloads : Category 1: Statutory Documents, Establishment Documents
Bye Laws of Gramonnati Mandal Trust
College Permission Letters
Downloads: Category 2 : Forms
Salary Certificate Application
Requisition or Demand Note मागणी पत्र
Application for Short Term Course
Refresher or Orientation Course
Attendance Certificate Format
Relieve Letter Format
Repair Maintenance Form
विद्यार्थी हमीपत्र Undertaking/Indemnity Form
स्वतःच्या जबाबदारीवर कॉलेजच्या उपक्रमात सहभागी होत असल्याबाबतLetterhead Gramonnati Mandal
Letterhead College MARATHI
Letterhead College ENGLISH
For newly joining teachers:
Joining Report Form Marathi
Appointment Order Letter Format
In case of newly appointed teachers : Maintain a personal file, Bio-data, Photo, Adhar, PAN copies, Copy of Bank passbook front page. College diary to be issued. Instructions regarding code of conduct be given.
Retired Teachers / Non-Teachers:
Maharashtra Civil Services (Pension) Rules 1982
महाराष्ट्र नागरी सेवा (पेन्शन) नियम १९८२ फॉर्म्स नमुने साठी लिंक :
https://finance.maharashtra.gov.in/Sitemap/finance/pdf/ActsRules/English/FIN.PUB.G.O.M.-3_31JULY1981-1.pdf
Downloads: Exam Related Forms
for payment to External Examiners,Guest Lecturers,etc
Govt Permission Letters
25-08-1995 New Subject/Division/Faculty BCom